"बीती ना बिताई रैना" गायिका/गायक- लतादीदी, भुपेंद्र संगीतकार- राहुल देव बर्मन गीतकार- गुलजार मी अजून शिकतोय त्यामुळे माझ्या गाण्यातल्या बालबुद्धीला जे समजलं ते मांडण्याचा प्रयत्न करतो फक्त. मुखड्याची जी पहिली ओळ आहे "बीती ना बिताई रैना" फक्त ह्या ओळीसाठीच बिहाग वापरला आहे. म्हणजे 'प प मं, ग म ग रेसा, ग', ह्यामध्ये 'रेसा'पर्यंतच बिहाग वापरला आहे. पण त्यानंतरचा जो गंधार आहे तो मात्र यमन कल्याण मधला आहे. आणि एक म्हणजे यमन रागामधे फक्त तीव्र मध्यम तर यमन कल्याण मध्ये तीव्र सोबतच शुद्ध माध्यमसुद्धा खूप खुबीने वापरतात जो पंचमदानी खूप सुरेखपणे वापरला आहे ह्या गीतामध्ये. त्यानंतर मधला piece आहे तिथे परत बिहाग आलाय. पण अंतरा जेव्हा चालू होतो त्यावेळी जी सुरुवातीची phrase लतादीदींनी गायलीय तिथे कलावती रागच दर्शन होतं.फक्त अंतऱ्याची सुरुवात करताना शुद्ध निषाद विवादी म्हणून वापरला आहे. लतादीदींच्या कलावतीच्या "हो हो" मधून जेव्हा भुपेंद्र ते "हो हो" काढून घेतात त्यावेळेस पुन्हा यमन कल्याण खूप छान पद्धतीने दाखवलाय. अंतरा संपवून...
Posts
Showing posts from July, 2017